हिट अँड रन केस आरोपीला अवघ्या एका तासात अटक

0
5
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक देऊन ट्रक सह पलायन केलेल्या आरोपील अवघ्या एका तासात अटक करण्याची कामगिरी बेळगाव पोलिसांनी केली आहे.

हिरेबागेवाडी आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अवघ्या दोन तासांत ट्रकसह पळून गेलेल्या आरोपीला अटक करत कार्यतत्पता दाखवली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ट्रक चालक हमीदखान रुक्कुद्दीन याने आपला ट्रक वेगाने चालवताना रस्ता ओलांडणाऱ्या उमेश देशनूरकर (अंदाजे ३० वर्षे) याला धडक दिली,

ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक न थांबवता पळून गेलेल्या चालकाला कित्तूर पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याच्या सहाय्याने आणि हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शोधून त्याला ताब्यात घेतले.

 belgaum

सदर घटना 14 जून रोजी दुपारी 1: 09 वाजता हिरेबागेवाडी ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर (एचपी पेट्रोल पंप आणि माणिक्या हॉटेलजवळ) घडली. मयत उमेश याला रस्ता ओलांडताना धडक देऊन आरोपीने आपला ट्रक वेगाने पळवला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुंदरेश यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तिथे प्रत्यक्षदर्शी पेट्रोल पंप मालकाने दिलेली माहिती आणि अपघातस्थळी सापडलेला ट्रकच्या पुढील भागाचा तुटलेला तुकडा आणि हिरेबागेवाडी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. अंबडगट्टी क्रॉसजवळ निघालेला जेएच-05/डीएस-9944 या अशोक लेलँड ट्रकला कित्तूर ठाण्याच्या मुख्य कॉन्स्टेबलच्या मदतीने अडवण्यात आले. ट्रकच्या तुटलेल्या पुढील भागावरून अपघाताची खात्री करून आरोपी हमीदखान रुक्कुद्दीन (वय ३२, रा. हथील, ता. पालवल, हरियाणा) याला ट्रकसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून तपास सुरू आहे.

प्रशंसा
अपघात घडताच तात्काळ कारवाई करून आरोपीला अत्यंत कमी वेळेत अटक करणाऱ्या हिरेबागेवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नवर आणि त्यांच्या पथकातील पडकीमठ, श्री. शिंगण्णवर, गौराज, बाबण्णवर, कोटगी तसेच बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर ठाण्याचे मुख्य कॉन्स्टेबल व्ही. सी. कुरी यांच्या पथकाच्या कार्याची प्रशंसा करत, बेळगाव पोलिस आयुक्त बोरसे भूषण गुलाबराव (आय.पी.एस., पोलीस आयुक्त, बेळगाव शहर) यांनी पथकातील सदस्यांना प्रशस्तिपत्र प्रदान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.