बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलिसांनी काल रात्री वैभव नगर येथील एका मटका अड्ड्यावर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटका खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गंगप्पा दानप्पा नाईक (वय ४०, रा. हुल्यानूर, ता. बेळगाव) हा वैभव नगरमधील रिलायन्स मॉलजवळ जुगार खेळत होता.
याची माहिती मिळताच सीसीबी विभागाचे पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी आरोपीकडून ४,२८० रुपये रोख रक्कम आणि मटका लिहिण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी ए.पी.एम.सी. पोलीस ठाण्यात के.पी. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी सीसीबी विभागाचे पीएसआय आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.