बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि ग्रामीण परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थ व मटकाविरोधी विशेष मोहीम राबवून पाच जणांना अटक केली आहे.
या कारवाईत ५,११० रुपये रोख रक्कम आणि अवैध धंद्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मुतगा- शिंदोळी रस्त्यावर सुमीत अनिल अष्टेकर आणि निखिल पुंडलिक इंगळे, होनगा गावाच्या हद्दीत विनोद इरन्ना दोडमनी, मारीहाळ गावाच्या हद्दीत नागेश गुदडप्पा बग्गोडी आणि निंगप्पा येल्लप्पा नेसरगी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या तिन्ही प्रकरणांमध्ये काकती आणि मारीहाळ पोलीस स्थानकाच्या पथकाकडून एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५,११० रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, त्यांनी संबंधित पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.