बेळगाव लाईव्ह : कलमेश्वर गल्ली, धामणे (ता. जि. बेळगाव) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथून येत्या रविवार दि. 22 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता धामणे ते पंढरपूर पायीदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या दिंडीत धामणे पंचक्रोशीतील गावांमध्ये समस्त वारकरी, भाविक -भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वै. प.पू. गुरुवर्य मौनानंद तुकाराम महाराज मुरगोड यांच्या शुभाशिर्वादाने सुरू होणाऱ्या या धामणे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याची सांगता येत्या सोमवार दि. 7 जुलै 2025 रोजी दुपारी महाप्रसाद वितरणाने होणार आहे.
सदर पायी दिंडीला रविवारी 22 जून रोजी सकाळी कलमेश्वर गल्ली, धामणे (ता. जि. बेळगाव) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथून प्रारंभ झाल्यानंतर पुढील 11 दिवस सदर दिंडी अनुक्रमे श्री कलमेश्वर मंदिर जुने बेळगाव, गिरीश होसुर मुत्त्यानहट्टी क्रॉस काकती, श्री ब्रह्मदेव मंदिर हळे गुडगेनहट्टी,
श्री अडवी सिद्धेश्वर मठ हुक्केरी (ता. बेळगाव), परीट नागलिंगेश्वर मंदिर चिक्कोडी, श्री गणेश मंदिर शिरगुप्पी, शांताई गार्डन आडवा रस्ता बेडक म्हैसाळ, आलगुडीम उत्तम पाईप फॅक्टरी, श्री दादासो बाबू पाटील पाटील वस्ती केरेवाडी, सदाशिव रंगनाथ रुपनर मारुती मंदिर उदयवाडी, आणि श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सावे बामणी गोडाऊन पांडुरंग इमले या ठिकाणी तर शेवटचे चार दिवस म्हणजे 4 ते 7 जुलै या कालावधीत सांगोला रोड, पंढरपूर येथील स्वातंत्र्यसैनिक सोसायटी येथे रात्रीचा मुक्काम करणार आहे. या कालावधीत दररोज दुपारच्या महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे.
तरी धामणे पंचक्रोशीतील देवगनहट्टी, मासगौंडहट्टी, कुरबरहट्टी, अवचारहट्टी जुने बेळगाव, वडगाव, शहापूर, बेळगाव, नंदीहळ्ळी, मंडोळी, हलगा, मुतगा, देसुर तारीहाळ, इदलहोंड गर्लगुंजी, माचीगड, नागुर्डा, माणिकवाडी वगैरे सर्व गावातील समस्त वारकरी, भाविक -भक्तांनी तन, मन, धन अर्पण करून या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन दिंडीचे शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


