बेळगाव लाईव्ह : सोशल मीडियाच्या धावत्या युगात अनेक प्रकारचे ऑनलाइन फसवेगिरीचे प्रकार समोर येत असताना चक्क पोलीस आयुक्तांच्या नावानेच बनावट फेसबुक आयडी तयार करून वापरली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
यासंदर्भात बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी देताना सदर बनावट प्रोफाइलच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून कुणी त्या बनावट अकाउंटला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन केले आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त यांच्या नावे फेसबुक वर एक हँडल आहे हे सर्वश्रुत असताना अज्ञातांकडून फसवेगिरी करण्यासाठी आणखी एक बनावट फेसबुल प्रोफाइल तयार करण्या आला आहे. त्या अकाऊंट वरुण अनेकांना विनंत्या केल्या जात आहेतत्यासंदर्भात अनेकांनी पोलीस आयुक्तांना याची कल्पना दिल्यानंतर सदर प्रोफाइल विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींची फेक प्रोफाइल बनवून लुटण्याचे प्रकार यापूर्वी घडले असताना नुकताच बेळगाव पोलीस आयुक्त पदी रुजू झालेल्या भूषण बोरसे यांच्या नावाने देखील फेक प्रोफाइल तयार करण्यात आली आहे.
सोशल मीडिया हॅण्डल करताना जनतेने सावधानतापूर्वक पावले उचलली तर पाहिजेतच याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या खोट्याने बनावट अकाउंटचा त्रास सहन करावा लागत आहे.