बेळगाव लाईव्ह : गेल्या तीन ते चार दिवसांपासून बेळगाव पोलिसांनी मटका, गांजा आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून बेळगाव शहर आणि ग्रामीण परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तीन मटका बुकींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. आहे.
बेळगाव-येळ्ळूर रोडवरील सागर पांडुरंग कुंडेकर (३५, रा. येळ्ळूर), खासबाग, बसव सर्कलजवळ अभिषेक रामा अंजनेकर (२४, रा. खासबाग, शहापूर) आणि गांधीनगर येथील कठारे अड्ड्याजवळ प्रमोद महेश येळ्ळूरकर (३२, रा. गांधीनगर) अशा तीन मटका बुकींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण ७०७१/- रुपये रोख रक्कम, ५०००/- रुपये किमतीचा एक मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण १२,०७१/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंभार, पोलीस उपनिरीक्षक मणिकांत पुजारी, माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय पाटीलआणि त्यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली आहे. तिन्ही आरोपींवर बेळगाव ग्रामीण, शहापूर, माळमारुती पोलीस स्थानकात टाकणारी दाखल करण्यात आल्या आहेत.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी तिन्ही पोलिस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या यशस्वी कारवाईचे कौतुक केले आहे.


