लाईव्ह : गरिबांना देण्यात येणाऱ्या घरांच्या वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, भारतीय जनता पार्टी, बेळगाव शाखेने आज काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली राणी चन्नम्मा सर्कल येथून जिल्हा पंचायत कार्यालयाला घेराव घालण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. कार्यालयासमोर पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी बोलताना, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “गरीब लोकांना घरे देण्याच्या नावाखाली काँग्रेस सरकार पैसे गोळा करत आहे, हा मोठा घोटाळा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी सुभाष पाटील यांनी केली.
या आंदोलनात महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, नेते संकल्प शेट्टर, जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे, मल्लिकार्जुन मादामण्णवर, धनश्री देसाई, महिला मोर्चा राज्य सचिव सोनाली सरनोबत, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, विनय कदम, माध्यम प्रमुख सचिन कडी, हनुमंत कोंगाळी, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष यल्लप्पा कोळकार, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष देशनूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महांतेश चिन्नप्पागौडर, सोशल मीडिया सह-संयोजक मनोज पाटील, धनंजय जाधव, प्रशांत अम्मिनभावी, श्रीकर कुलकर्णी, बसवराज साणिकोप्प, ज्योती शेट्टी, श्वेता जगदाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


