बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेने बकरी ईद सणानिमित्त पशुवैद्यकीय तपासणीसाठी अधिकृत कत्तल केंद्रांवर ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था ७ ते ९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राहणार आहे.
बकरी ईद सण ७ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार असून, त्यानिमित्त प्राण्यांच्या कत्तलीसाठी आवश्यक असलेल्या पशुवैद्यकीय तपासणीसाठी बेळगाव महानगरपालिकेने विशेष तयारी केली आहे.
महापालिका उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ३ जून रोजी झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्देश देण्यात आले होते. महानगरपालिकेने दोन अधिकृत कत्तल केंद्रांची नियुक्ती केली असून, या ठिकाणी पशुवैद्यकांना वेळेवर पोहोचवण्यासाठी खालील वाहनांची आणि चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे:
महानगरपालिकेने पशुवैद्यकांना वेळेत कत्तलखान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष वाहन व्यवस्था केली असून, त्यासाठी एकूण सात वाहने आणि चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये केए-२३ ए-९९४७ या वाहनासोबत मणिकांत,
केए-२२ एए-६०५० सोबत शिवनगौडा, केए-२२ डी-३०८९ सोबत प्रमोद, केए-२६ बी-०२०३ या वाहनासोबत नितेश, केए-०५ एजी-६२९९ सोबत आकाश भरण, केए-२२ डी-५१७४ सोबत यल्लप्पा, आणि केए-२२ एए-२८०७ या वाहनासोबत सागर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या सर्व चालकांना महापालिकेच्या मुख्य कार्यालयात वाहनासह हजर राहण्याचे तसेच कामकाज सुयोग्यपणे पार पाडावे आणि नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.