बेळगाव लाईव्ह :प्रवास भाड्याच्या वादातून समर्थनगर येथे गेल्या बुधवारी घडलेल्या ऑटोरिक्षा चालकावरील हल्ल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
प्रवास भाड्याच्या वादातून समर्थनगर येथे गेल्या बुधवारी एका गटाने शाहुनगर येथील अल्ताफहुसेन मुजावर या रिक्षाचालकावर हल्ला केला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला.
प्रवाशांनी त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर त्या पुढे रिक्षा चालवण्याची मागणी केल्यावर हा वाद सुरुवात झाली. यावेळी शिवीगाळ आणि धमक्यांनंतर युवराज चिक्कोडे आणि साई कणेरी यांच्यासह सुमारे आठ जणांनी ऑटोरिक्षा चालक अल्ताफहुसेन मुजावर याच्यावर काठ्यांनी हल्ला केला.

मारहाणीत अल्ताफहुसेन यांच्या डोक्याला दुखापत झाली. हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रवाशांनाही मारहाण करण्यात झाली होती.
सदर प्रकरणी आता मार्केट पोलिसांनी 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


