बेळगाव लाईव्ह :थिंपू, भूतान येथे येत्या दि. 11 ते दि. 15 जून 2025 दरम्यान होणाऱ्या दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव आणि फिजिक स्पोर्ट्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर, किरण वाल्मिकी व व्यंकटेश ताशिलदार या शरीर सौष्ठवपटूंचे बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेतर्फे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
थिंपू, भूतान येथील आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेल्या प्रताप कालकुंद्रीकर, किरण वाल्मिकी व व्यंकटेश ताशिलदार या शरीर सौष्ठवपटूंना हाईलॉक हायड्रोटेक्निक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दिलीप चिटणीस आणि उद्योगपती शिरीष गोगटे यांच्याकडून मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

भूतान येथील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेतर्फे उपरोक्त तीनही शरीर सौष्ठवपटूंचे अभिनंदन करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, उद्योजक दिलीप चिटणीस, शिरीष गोगटे, अजित सिद्धनावर, एम. गंगाधर, सुनील राऊत, बसवराज अरळीमट्टी, सुनील पवार आदी उपस्थित होते.