belgaum

सौंदलगा श्री लक्ष्मी देवीची उत्साहात प्रतिष्ठापना

0
53
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सौंदलगा येथील श्री लक्ष्मी देवीच्या त्रैवार्षिक यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली असून त्या दिवशी सकाळी 9 वाजता गावातील कुंभार गल्लीतील गादीवर लक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री लक्ष्मी देवीची पूजा करून व ओटी भरून यात्रेचा उत्साहपूर्ण भक्तीभावात शुभारंभ करण्यात आला.

प्रारंभी श्री लक्ष्मी यात्रा कमिटी कार्यालयापासून वाद्यांच्या गजरात मान्यवरांचे लक्ष्मी देवीच्या गदगेजवळ आगमन झाल्यानंतर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष आण्णासो पाटील, उपाध्यक्षा शोभा कोळी, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिकोडी जिल्हा कॉग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, डॉ. सुहास कुलकर्णी, नचिकेत कुलकर्णी, यात्रा कमिटी अध्यक्ष पुंडलिक चेंडुगळे, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, खजिनदार आप्पा सुरवसे, शशिकांत पाटील, दत्तात्रय आणि गणपती गाडीवड्डर यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर देवीची ओटी भरून आरती करण्यात आली. प्रसंगी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्रा शुभारंभप्रसंगी यात्रा कमिटीच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मानकरी पाटील यांनी देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर ग्रामस्थांकडूनही नैवेद्य अर्पण करण्यात आला. काल सोमवारी 19 रोजी श्री लक्ष्मी देवीची पूजा इरेस्वामीगौडा इटगणी, यात्रा कमिटी सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते तर, सायंकाळी 5:19 च्या मुहूर्तावर युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते पूजा होऊन सवाद्य मिरवणूक पार पडली.

 belgaum

दरम्यान, तीन वर्षातून एकदा होणाऱ्या या यात्रेमुळे गावात पै-पाहुण्यांची रेलचेल वाढली असून प्रत्येक गल्लीसह सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गावात उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक घरात यात्रेची धामधूम सुरू असल्याचे दिसून येत आहे. यात्रा कामिटीने यात्रेचे नेटके नियोजन केले असून पात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

यात्रा काळात वाहन चालक मालकांची गैरसोय होऊ नये यासाठी लोहार गल्ली, शेवाळे गल्ली, हायवे ते मेन रोड मल्टीपर्पज संस्थेपर्यंत, बाडकर गल्ली, पाटील गल्ली, खराडे गल्ली, कुंभार गल्ली, धनगर गल्ली, माळी गल्ली, पंचायत मागील, दिगडे गल्ली, चौंडेश्वरी गल्ली, कुंभार गल्ली, सुतार गल्ली, शिंदे गल्ली, कुटाळे गल्ली, खाडे गल्ली, चांभार गल्ली, जहुर गल्ली, कोरवी गल्ली, पिर गल्ली, अडसूळ गल्ली याठीकाणी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.