बेळगाव लाईव्ह : केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन आणि यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने ‘पर्यावरणपूरक विकास आणि उद्योजकता’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. लेओ इंजिनिअर्स, बेळगावचे संचालक जयदीप बिरजे आणि व्यवस्थापकीय भागीदार सोनाली बिरजे यांच्या उपस्थितीत हे सत्र पार पडले.
‘पर्यावरणपूरक विकास आणि उद्योजकता’ या विषयावर आधारित हे सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक ठरले.
जयदीप बिरजे आणि सोनाली बिरजे यांनी त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव, उद्योग क्षेत्रातील वास्तविकता आणि पर्यावरणपूरक विकासाचे महत्त्व यावर जोर देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

विशेषतः विक्री आणि विपणनावरील संवादात्मक उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या आवडीने भाग घेतला आणि त्यातून प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव घेतला.