बेळगाव लाईव्ह -अलीकडेच येथील समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीने नूतनीकरण केलेल्या मुख्य कार्यालयाचे आणि कार्पोरेट ऑफिसचे उद्घाटन संपन्न केले. संस्थेची ही कार्यालये पाहून सभासद व हितचिंतकानी समाधान व्यक्त केले.
या घटनेचे औचित्य साधून सोसायटीच्या वतीने 30 मे 2025 ते 30 जून 2025 या फक्त एक महिन्याच्या कालावधीसाठी एक विशेष ठेव योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत या कालावधीत ठेवल्या जाणाऱ्या ठेवीवर 11 टक्के व्याज दिले जाणार आहे.
ही योजना समर्थ सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये अमलात आणण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन सोसायटीचे चेअरमन ऍड अजय सुनाळकर, व्हॉइस चेअरमन अभय जोशी आणि संचालक मंडळाने केले आहे.
या विशेष योजनेबरोबरच बाकीच्या विविध कालावधीच्या व वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व ठेव योजना नेहमीप्रमाणे चालू राहणार असल्याचेही कळविण्यात आले आहे