बेळगाव लाईव्ह :पहलगाम हल्ल्या नंतर भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरासह कर्नाटकातील ही तीन शहरात मॉक ड्रील करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या मॉक ड्रीलच्या लिस्टमध्ये बेळगाव शहराचं नाव नाही बेंगलोर शहर, रायचूर आणि मल्लेश्वरम या तीन ठिकाणी मॉक ड्रील करण्याच्या सूचना केंद्रीय गृह खात्याने दिले आहेत.
देशातील अनेक राज्यांमध्ये नागरी संरक्षण विभागाला मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यासाठी सरकारने मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मॉक ड्रिल दरम्यान काय होणार?
हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनच्या संचालनाची सूचना.
हल्ल्याच्या दरम्यान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना नागरी सुरक्षिततेच्या प्रत्येक स्तरावर प्रशिक्षण दिलं जाईल.
गरज पडल्यास वीज बंद करता यावी यासाठी क्रॅश ब्लॅक आऊट उपायांचं प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून शत्रूला लक्ष्य गाठता येऊ नये.
महत्त्वाचे कारखाने, कार्यालये आणि ठिकाणे लपवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल.
परिस्थिती बिघडल्यास ठिकाण कसं सोडायचं याचा सराव करण्यात येईल.