बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ यांनी देवदर्शनासाठी आज बुधवारी बेळगाव शहरानजीकच्या श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री मंदिराला भेट देऊन पंत पादुकांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
श्री दत्त संस्थान ट्रस्टी डॉ.संजय पंतबाळेकुंद्री यांनी संस्थानतर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शाल- श्रीफळ देऊन हार्दिक स्वागत केले. पंत पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री मुश्री यांनी दुपारी मुक्तद्वार अन्नछत्रास भेट देऊन भक्तांसमवेत महाप्रसाद घेतला.
तसेच श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री परिसराला भेटी देऊन विविध भागातून आलेल्या भक्तांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

गेल्या 30 वर्षातील राजकीय कार्यकाळात मंत्री हसन मुश्रीफ यांनी 750 हून अधिक मंदिराना शासकीय अनुदान देऊन मंदिरांची उभारणी केली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील त्यांच्या आजच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
यावेळी मंत्री महोदयांसोबत बिद्री कारखान्याचे संचालक भूषणदादा पाटील, प्रदीप पाटील भुयेकर, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळभोर, बाबासो नाईक, विकासराव पाटील, चंद्रकांत पाटील कौलगे, आनंद पवार लिंगनूर, गुंडा आवळेकर,बाबासो सांगले, रामचंद्र शिंदे, श्रीरंग पोवार, दत्ता पोटले, बालमुकुंद पोवार, एच एन पाटील, हिंदुराव पाटील आदींसह श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री देवस्थान ट्रस्ट सर्व सदस्य व गडहिंग्लज, कागल, गारगोटी, निपाणी भागातून आलेले गुरुबंधू उपस्थित होते.