बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथे झालेल्या 19.35 कोटी रुपयांच्या मायक्रोफायनान्स कर्ज घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.
बेळगाव येथे झालेल्या 19.35 कोटी रुपयांच्या मायक्रोफायनान्स कर्ज घोटाळ्यात 7,700 हून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे.
फसवणूक होणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. यमनापूर येथील चार आरोपींनी पीडितांना खोटे अनुदानाचे आश्वासन देऊन आमिष दाखवले त्यानंतर मंजूर कर्जाचा मोठा भाग घेऊन ते पसार झाले.
कर्नाटकात पसरलेल्या या घोटाळ्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.