बेळगाव लाईव्ह :बेळगाव ही औद्योगिक क्षेत्रातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. याच औद्योगिक क्षेत्रात विविध समस्या निर्माण होतात. मात्र याच कारखान्यांमधील काही रासायनिक ड्रेनेज मिश्रित पाणी अनेक जनावरांच्या जीवावर भेटू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन वेळीच अपघात टाळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नुकतीच मंड्यामध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये विषारी पाणी पिऊन ३० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. मंड्या जिल्ह्यातील मद्दूर तालुक्यातील सोमनहल्ली येथे ही दुर्घटना घडली.
या मेंढ्या औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त पाणी पिल्याने दगावल्याचे सामोरे आले आहे. त्यामुळे याचा विचार आतापासून जिल्हा प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
विशेष करून पाळीव प्राणी मालकांना याबाबत खबरदारी घेण्याची गरज या घटनेवरून गरजेची वाटू लागली आहे .याकडे विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी आतापासून त्यांना सूचना केल्या सोयीचे ठरणार आहे.
राजू आणि सुनील यांच्या मालकीच्या ३० हून अधिक मेंढ्या आता मृत्युमुखी पडल्या आहेत.औद्योगिक क्षेत्रातील पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडला आहे. दरम्यान या औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त पाणी ड्रेनेज द्वारे बाहेर सोडणे गरजेचे होते. मात्र तसेच झाले नसल्याने 30 मेंढ्यांना आपला जीव गमावा लागल्याचे घटना उघडकीस आले आहे. त्यामुळे आता बेळगाव औद्योगिक क्षेत्रात ही काळजी घेणे गरजेचे बनले आहे.