बेळगाव लाईव्ह: गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन एका कॅन्टीनचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी होसूर येथे घडली. पिंपळकट्टा, होसूर येथील एका कॅन्टीनमधील गॅस सिलेंडरचा आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला.
सदर स्फोटाप्रसंगी त्या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे सुदैवाने जीवित हानी अथवा कोणालाही इजा झाली नाही. तथापि कॅन्टीन मधील साहित्य उध्वस्त होऊन इतस्ततः विखरून पडण्यासह इलेक्ट्रिक वायरिंग जळाली होती.
स्फोटाच्या आवाजाने आसपासच्या लोकांनी कॅन्टीनकडे धाव घेऊन तापलेला सिलेंडर बाहेर काढून त्यावर पाणी ओतले.
उन्हाने तापलेल्या पत्र्यांमुळे सदर स्फोटाची घटना घडली असावी असा काय आज उपस्थितीमध्ये व्यक्त केला जात होता. सदर प्रकारामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.