बेळगाव लाईव्ह: खाऊ कट्टा गाळे प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुजित मूळगुंद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शनिवारी दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे.
बंगळुरू नगरविकास खात्याच्या सचिवांच्या समोर ही सुनावणी होणार आहे.बेळगाव शहरातील खाऊ कट्टा येथील गाळे वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सुजित मूळगुंद यांनी विद्यमान महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्या विरोधात याचिका दाखल करत पद रद्द करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार प्रादेशिक आयुक्तांनी दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश बजावला होता या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयात दोन्ही नगरसेवकांनी आव्हान दिले होते त्याला स्थगिती मिळाली होती.
उच्च न्यायालाच्या आदेशानुसार याच प्रकरणाची सुनावणी शनिवारी दुपारी 3 वाजता नगरविकास खात्याच्या सचिवांपुढे होणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे.नगरविकास खात्याच्या सचिव वरिष्ठ आय ए एस अधिकारी दीपा चोळण यांच्या समोर सुनावणी होणार आहे.




