ग्रा.पं.कडून विक्रमी 110 कोटी मालमत्ता कर वसुली -जि. पं. सीईओ शिंदे

0
43
Zp ceo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींकडून 2024 -25 सालामध्ये विक्रमी 110 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी दिली. सदर कर वसुलीमध्ये साखर कारखान्यांकडून येणारी देणी आणि सांबरा विमानतळ प्राधिकरणाच्या 1 कोटी रुपयांचा समावेश असून विमानतळ प्राधिकरण आता दरवर्षी 45 लाख रुपये मालमत्ता कर अदा करते, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून यंदा विक्रमी 110 कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 500 ते 600 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.

रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना रोजगार देऊन समान कामाला समान वेतन दिले जात आहे. यामुळे महिला व पुरुषांना दिल्या जाणाऱ्या रोजगारातील भेदभाव दूर झाला आहे, असेही सीईओ राहुल शिंदे यांनी सांगितले. विजेचा अपव्यय रोखून 13 कोटींची वीज बचत करण्याचा अभिनव प्रयोग जिल्ह्यात राबवण्यात आला आहे त्याची दखल राज्य सरकारने घेतली असून ई-अस्थी उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत मालमत्ता धारकांना मालमत्तेचे कार्ड दिले जात आहे.

 belgaum

शैक्षणिक परीक्षा निकालाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सराव परीक्षा घेतल्या जात आहेत. प्रत्येक गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत 538 गावांना बहुग्राम पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवले जात आहे.

उर्वरित गावांमध्ये हे काम प्रगतीपथावर आहे. यंदा आतापर्यंत एकाही गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. तथापि 218 गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी पुढे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.