बेळगाव लाईव्ह :बेळगांव येथील कादंबरीकार प्रा डॉ विनोद गायकवाड यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) यांचा पहिला कै. महादेव मोरे पुरस्कार करण्यात आला.हा कार्यक्रम शनिवारी रोजी शाहू संस्कृती भवन कोल्हापूर येथे पार पडला.
शिवाजी विद्यापीठ चे माजी कुलगुरू मा माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्या उपस्थितीत व उपरोक्त पुरस्काराने गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना मा माणिकराव साळुंखे म्हणाले पुरस्कारामुळे महत्वाच्या साहित्यकृतीकडे लक्ष वेधले जाते आणि साहित्यिकाला आपण सर्वापेक्षा उत्तम साहित्य निर्माण केले पाहिजे या जबाबदारी ची जाणीव होते.

पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना प्रा. डॉ . गायकवाड म्हणाले महादेव मोरे हे सीमाभागातील थोर साहित्यिक त्यांच्या नावाचा पुरस्कार हा मोठा सन्मान आहे तो मला खूप प्रेरणादाई आहे.त्यांच्या नावाचा हा पहिलाच पुरस्कार असलेल्या ने त्याला वेगळे महत्त्व आहे.
रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या युगांत त्या पुरस्कारामूळे साहित्यिकांची हि दाद मिळाली याचा आनंद आहे . या पुस्तकाबद्दल डॉ गायकवाडांचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.




