बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात पुन्हा मंदिरावर दगडफेक करण्याची घटना पांगुळ गल्ली येथे घडली असून त्यामुळे काल रात्री या ठिकाणी कांही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
यावेळी पाहणी करण्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांनी प्रक्षुब्ध झालेल्या स्थानिक रहिवाशांची समजूत काढून गुन्हेगाराला तात्काळ गजाआड केले जाईल असे आश्वासन दिले.
. आश्वासनानुसार पोलिसांनी अल्पावधीतच दगडफेक करणाऱ्या समाजकंटक युवकाला शोधून काढून त्याला ताब्यात घेतले आहे. तथापि मंदिरावरील दगडफेकीच्या घटनेमुळे पांगुळ गल्ली परिसरात कांही काळ तणाव निर्माण झाला होता.
मागील महिन्यात देखील अशाच पद्धतीने युवकाने मंदिराच्या गेटवर दगडफेक केली होती त्याला देखील अटक करून पोलिसांनी त्याची रवानगी केली होती पुन्हा एकदा पांगुळ गल्ली तोच प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांनी अशा घटनांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी वाढू लागली आहे. आरोपीला कठोर शासन करावे अशीही मागणी स्थानिकांनी केली आहे.