बेळगाव लाईव्ह :सुप्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधवा यांच्या गाण्यामुळे बेळगाव येथील शांताई वृद्धाश्रम सेकंड चाइल्डहुड हे देशभरात चर्चेत आले असून बेळगावसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
शांताई वृद्धाश्रमातील आजींनी अलीकडेच गुरु रंधावा यांचे नवीन गाणे “कताल” वर एक मजेदार आणि उत्साही रील बनवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या रीलला अल्पावधीत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
उत्साह एवढ्यावरच थांबत नाही तर स्वतः गायक गुरु रंधावा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर बेळगावच्या आजींची रील शेअर केली आहे हे विशेष होय. अनेक प्रसिद्ध नर्तक आणि कलाकार देखील त्यांच्या स्टोअरीमध्ये ही रील जोडून शांताई वृधाश्रमावर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

“शांताई सेकंड चाइल्डहुड” हे इंस्टाग्राम पेज बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांची प्रतिभावंत मुलगी चेरिल मोरे व्यवस्थापित करते. आपल्या सर्जनशीलता आणि आवडीने चेरिल वृद्धांना चमकण्यास मदत करत आहे आणि बेळगावचे नांव नवीन उंचीवर नेत आहे.
शांताई सेकंड चाइल्डहुडचे सदस्य दाखवत आहे की वय हे फक्त एक आकडा आहे आणि ते त्यांच्या आनंदाने व उर्जेने शहराला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहेत.