बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालयाच्या 2001- 2002 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. मेळाव्यात अनेक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
येथील खाजगी हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी माजी विद्यार्थ्यांच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख सांगून परिचय करून दिला.
याबरोबरच सध्या करत असलेल्या व्यवसायाची माहिती दिली. अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामाची माहिती देऊन नवीन नवीन क्षेत्राबद्दल माहिती सांगितली. शिक्षण, स्पर्धा परीक्षा कोचिंग, उद्योजक, कृषी, व्यापार ,व्यवसाय, खान आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्राविषयी माहिती दिली.
यावेळी माजी विद्यार्थी उद्योजक उमेश कुबल,छायाचित्रकार रितेश वकलीग, व्यावसायिक राजू घाटगे. व्यापारी संभाजी काळे,ऍड. नामदेव मोरे, प्रा. रेश्मा सामजी, दीपा पाटील, प्रा सुनील लोंढे प्रा. डॉ. प्रकाश मदारी, शिक्षक धीरजसिंग रजपूत, प्रा. संतोष, व्यवसायिक विजय लिंगायत,

उद्योजक सुनील कळेकर, रवी पाटील, शिक्षक मधु पाटील, बाळाताई शिवनगेकर, मनीषा पाटील, आदींनी आपल्या व्यवसायाशी निगडित असणारी माहिती दिली. इतर वर्ग मित्रांना प्रोत्साहन दिले. यावेळी मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले.शिक्षक लक्ष्मण तळवार यांनी शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.