बेळगाव लाईव्ह:अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रज्वल अण्णासाहेब कुप्पानट्टी (वय 20, मूळ रा. बुवाची सौंदत्ती, तालुका रायबाग सध्या रा. शिवबसवनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
माळमारुती पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार की, प्रज्वल हा मूळचा रायबाग तालुक्यातील असून तो शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. शिवबसवनगर परिसरातील हॉस्टेलमध्ये राहून तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता. तिकडून आल्यानंतर सायंकाळच्या वेळी त्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही माहिती माळमारुती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्याच्या मूळ गावाकडून पालकांना बोलावून घेतले. मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद प्रक्रिया सुरू होती.
मानसिक अस्वास्थ्यातून त्याने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक जे एम कालीमिर्ची तपास करत आहेत.