बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व मालमत्तांच्या मालकांना कळविण्यात येते की, चालू वर्ष 2025-26 साठी संपूर्ण मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना या एप्रिल महिन्यापासून 5 टक्के सवलत देण्याचा कालावधी सुरू झाला आहे.
बेळगाव महापालिकेने करदात्यांना त्यांचा मालमत्ता कर अर्थात घरपट्टी ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी “ऑनलाइन पेमेंट इंटिग्रेशन ऑफ प्रॉपर्टी टॅक्स” सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
त्यामुळे संबंधितांना घरपट्टीचे चलन घेण्यासाठी महापालिकेच्या महसूल कार्यालयात जावे लागणार नाही. ज्या मालमत्ता करदात्यांना त्यांच्या मालमत्ता कराबाबत पीआयडी क्रमांकासह संगणकीकृत फॉर्म -1 आधीच मिळाला आहे ते त्यांचा मालमत्ता कर बेळगाव -1 केंद्रामध्ये आणि डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन देखील भरू शकतात. करातील सवलत पीआयडी अहवालात तयार केलेल्या कॉलम क्र. 35 मध्ये दृश्यमान आहे.
कराचे पैसे भरणे (पेमेंट) पेटीएम किंवा http://belagavicitycorp.org/ वर करता येऊ शकते. बेळगावमध्ये मालमत्ता कर ऑनलाइन कसा भरायचा (केवळ क्रेडिट /डेबिट /इंटरनेट बँकिंग /युपीआय द्वारे पेमेंट) : http://belagavicitycorp.org/ वर जा. ऑनलाइन सेवांवर क्लिक करा – पीआयडी प्रविष्ट करा आणि फॉर्म 1 मिळविण्यासाठी सर्च बटणावर क्लिक करून नंतर ऑनलाइन पेमेंट करा.
जर तुम्हाला तुमचा पीआयडी माहित नसेल तर निकषांनुसार सर्च करा. जसे की तुमचा वॉर्ड क्रमांक, जुना कर क्रमांक, नवीन कर क्रमांक, मालकाचे नांव किंवा मोबाईल क्रमांक वापरा. त्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा. तुम्हाला मालमत्तेची माहिती मिळेल. तुमचा संपूर्ण मालमत्ता कर तपशील पाहण्यासाठी व्ह्यू लिंकवर क्लिक करा.