belgaum

मंत्री हेब्बाळकर यांच्या वाहनाला ठोकरणाऱ्या ट्रकचा छडा; चालकाला अटक

0
28
Truck driver
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला धडक देऊन फरारी झालेल्या ट्रक चालकाचा छडा लावण्यात बेळगाव पोलिसांना तब्बल तीन महिन्यानंतर यश आले असून याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील मधुकर कोंडीराम सोमवंशी या ट्रकचालकाला अटक करण्याबरोबरच अपघातग्रस्त ट्रक जप्त करण्यात आला आहे.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी काल बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सदर माहिती दिली. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी बाळकर व त्यांचे बंधू विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे गेल्या 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी सरकारी इनोव्हा कार (क्र. केए 01 जीए 9777) मधून बेंगलोर येथून बेळगावकडे येताना कित्तूर जवळ अंबडगट्टी क्रॉस नजीक एका ट्रकने ठोकरल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. अपघातानंतर ट्रकसह ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते.

या अपघातात मंत्री लक्ष्मी हेबाळकर जखमी झाल्या होत्या वैद्यकीय उपचारानंतर त्यांना घरात विश्रांती घ्यावी लागली होती. त्यांचे बंधू चन्नराज व सुरक्षा रक्षक ईराप्पा हुनशीकट्टी हे देखील अपघातात जखमी झाले होते. याप्रकरणी इनोव्हा चालक शिवप्रसाद जी. (वय 39) याने दिलेल्या फिर्यादीनुसार कित्तूर पोलीस ठाण्यात हीट अँड रन गुन्हा नोंद झाला होता.

 belgaum

मंत्र्यांच्या वाहनाला ठोकणारा ट्रक चालक कोण? याचा उलगडा होत नव्हता. मात्र आता तब्बल तीन महिन्यानंतर सदर अपघातास कारणीभूत ट्रक चालकाचा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने तपास करून शोध घेण्यात आला आहे. बेळगाव पोलिसांनी मधुकर कोंडीराम सोमवंशी (वय 65, रा. तक्रारवाडी ता. इंदापूर जि. पुणे) याला अटक केली असून अपघातग्रस्त ट्रक (क्र. एमएच 12 टीव्ही 9740) देखील जप्त केला आहे.Truck driver

एफएएल तज्ञांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांची तपासणी करण्यात आली व नमुने जप्त करून आरएफएसएल विभागाकडे पाठवले होते. तसेच वाहतूक विभाग अहवाल आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड आधारे गुन्ह्यात ट्रक चालकाचा सहभाग होता हे स्पष्ट झाल्याने याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.

उपरोक्त कारवाईमध्ये बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नाईक आणि कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, प्रवीण कोटी, एन. आर. गलगी, सीपीसी कर्मचारी व जिल्हा टेक्निकल सेलचे विनोद बक्कन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.