बेळगाव लाईव्ह :वडगाव, बेळगाव येथील रहिवाशी आणि लिओ इंजिनियर्सचे मालक सीईओ जयदीप बिर्जे यांना अलीकडेच जर्मनी येथील हॅनोव्हर मेस्से -2025 येथे संघीय आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती मंत्रालयातर्फे आयोजित ‘भारत-जर्मन सहकार्य’ या विषयावरील गट चर्चेत सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला.
हॅनोव्हर मेस्से येथील पॅनल डिस्कशन अर्थात गट चर्चेदरम्यान जयदीप यांनी जर्मन तंत्रज्ञान आणि भारतीय बाजारपेठेच्या विकसित होत असलेल्या गरजांशी त्याचे संरेखन यावर मौलीक विचार व्यक्त केले.
या सत्रात भारत, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, चिली आणि इतर देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. त्यामुळे औद्योगिक नवोपक्रम, आर्थिक भागीदारी आणि भविष्यातील सहकार्याच्या संधींबद्दल जागतिक स्तरावर विचारांची देवाणघेवाण झाली.
या संवादातून तंत्रज्ञान-चालित उपाय, शाश्वत औद्योगिक वाढ आणि बाजार-विशिष्ट आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले.