शहरातील ख्रिश्चन धर्मियांकडून प्रार्थनेद्वारे गुड फ्रायडे सेवा प्रारंभ

0
8
Good Friday
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसरातील सर्व चर्चमध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या ख्रिश्चन धर्मियांनी ‘द गोवन वे ऑफ द क्रॉस’ या प्रार्थनेद्वारे गुड फ्रायडे भक्तीभावाने साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

शहर परिसरातील सर्व चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर चढवण्याच्या स्मरणार्थ मुख्य गुड फ्रायडे सेवा आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली असून ती संध्याकाळी समाप्त होणार आहे.

या सेवेमध्ये ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, गुड फ्रायडेच्या एक दिवस आधी शहरातील चर्चमध्ये काल गुरुवारी मौंडी थर्सडे साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरासह आसपासच्या सर्व चर्चमध्ये प्रार्थना सेवा देण्यात आल्या, जिथे ख्रिश्चन बांधवांनी पुजाऱ्यांद्वारे शिष्यांचे पाय धुण्याच्या धार्मिक विधीत भाग घेतला होता.Good Friday

 belgaum

परंपरेनुसार गुड फ्रायडेच्या आधी गुरुवारी संध्याकाळी हा विधी पाळला जातो. जेंव्हा येशू ख्रिस्ताने त्यांना वधस्तंभावर खिळवण्यापूर्वीच्या संध्याकाळी त्यांच्या 12 शिष्यांचे पाय धुतले होते. जगभरातील ख्रिश्चन लोकांद्वारे पाळल्या जाणाऱ्या या सेवेचा उद्देश लोकांना नम्रता आणि सेवेचा संदेश देणे हा आहे.

फातिमा कॅथेड्रल येथे प्रार्थना सेवेदरम्यान सर्व चर्चमधील पुजाऱ्यांनी येशूच्या कृतीचे स्मरण केले, तर बिशप डेरेक फर्नांडिस यांनी पुरुष आणि महिलांसह आपल्या 12 शिष्यांचे पाय धुतले. त्यांनी येशू ख्रिस्ताने शिकवलेला लोकांना सेवा आणि नम्रतेचा संदेश देखील दिला. शहर परिसरातील सर्व चर्चमध्ये काल गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत ख्रिश्चन धर्मीयांनी गुड फ्रायडेची प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.