बेळगाव लाईव्ह :देसूर (ता. जि. बेळगाव) येथील डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक कमिटी व दलित संघर्ष समिती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार दि. 12 ते सोमवार 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन मूर्तीची मिरवणूक व प्रतिष्ठापना सोहळ्यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आंबेडकरनगर वासियांच्यावतीने व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सौजन्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन मूर्तीची भव्य मिरवणूक शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आयोजनात आली आहे.
बेळगाव येथील राणी चन्नम्मा चौकाजवळील डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानापासून या मिरवणुकीला प्रारंभ होणार असून देसुर येथील डॉ. आंबेडकर भवन येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.
तरी सदर मिरवणुकीसह आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ग्रामपंच कमिटीसह गावकरी, युवक मंडळे व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शोभा वाढवावी, असे आवाहन डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक कमिटी व दलित संघर्ष समिती शाखा देसूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.