बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील खंजर गल्ली येथील एका शेडमध्ये बेकायदेशीर कृत्यं सुरू असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित शेड तात्काळ हटवल्याची घटना आज घडली.
बेळगाव शहरातील खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केट परिसरात असलेल्या एका शेडमध्ये अनेक दिवसांपासून बेकायदेशीर कृत्ये सुरू होती. यासंदर्भात महापालिकेकडे सातत्याने सार्वजनिक तक्रारी येत होत्या.
या वाढत्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक लक्ष्मी निप्पाणीकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी धडक कारवाई करण्यात आली.


निप्पाणीकर यांच्या नेतृत्वाखाली अन्य मनपा अधिकारी व अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांनी लक्ष्मी मार्केट परिसरात दाखल होऊन बेकायदेशीर कृत्यांचे केंद्र असलेले ते शेड युद्ध पातळीवर हटवले.
महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.