बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात क्रिकेट बेटिंग चालवणाऱ्यास अटक करून त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम जात करण्यात आली आहे.
बेळगाव शहराच्या सीईएन पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन सट्टेबाजांना एका सट्टेबाजाला अटक करण्यात आली आहे तर एक फरार झाला आहे.

पोलीस उपायुक्त आणि माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार क्रिकेटवर बेटिंग लावणाऱ्या रॅकेटचा सीएन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी उद्धव जय रामदास रोचलानी वय 61 राहणार सिंधी कॉलनी बेळगाव यास अटक करण्यात आली आहे तर त्यांच्या मुलगा करण उद्धव रोचलानी हा फरार झाला आहे.
सी एन पोलिसांनी या सट्टेबाजी अड्ड्यावर धाड टाकत त्यांच्याकडून एक अँड्रॉइड फोन, एक आयफोन 12 आणि 13 साधे मोबाईल याच्यासह एक हॉटलाइन ऑडिओ मिक्सर, एक स्मार्ट टीव्ही आणि दोन लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे आणि या माध्यमातून दोघे बाब लेक बॅटिंग चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सिंधी कॉलनी हिंडलगा येथे धाड टाकत रोख रक्कम आणि मोबाईल संच जप्त केले आहेत.