बेळगाव लाईव्ह : खानापुर तालुक्यातील बालोगा गावातील शिवनगौडा पाटील (वय 47 वर्ष) या व्यक्तीला दगडाने ठेचून निर्घृणपणे ठार करणाऱ्या आरोपीला कलबुर्गी येथे अटक करण्यात आली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.
गुरुवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, खानापुर तालुक्यातील गाडीकोप्प गावाजवळ मृत व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. दगडाने डोके ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. ओळख पटल्यानंतर शिवनगौडा पाटील यांची हत्या झाल्याचे समजले होते.
घटनेच्या 24 तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हत्या केल्यानंतर आरोपी कलबुर्गी येथे पळून गेला होता. परंतु पोलिसांनी त्याला कलबुर्गी येथे ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.आहे. या खून प्रकरणी पकडण्यात आलेला आरोपी बीडी गावातील असून त्याचे नाव बसाप्पा होसट्टा असे आहे.
शिवनगौडा पाटील यांना त्यांच्या घरातून बोलावून घेऊन जात त्यांच्यासोबत मद्यपान व जेवण करून शेतात नेऊन त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले आहे.
आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद दिली