बेळगाव लाईव्ह:अनावधानाने नियंत्रण सुटून ऑटो रिक्षाने दुभाजकाला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात रिक्षा चालक मृत्युमुखी पडल्याची घटना काल रात्री उशिरा हालगा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर घडली.
मयत ऑटोरिक्षा चालकाचे नांव मोहम्मदअली शब्बीरहमा भारागीर (वय 45 वर्षे, रा. न्यू गांधीनगर) असे आहे.
धामणे गावातील सासूच्या घरी जेवण आटोपून घरी परतत असताना हालगा गावातील पब्लिक स्कूलजवळ राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकाला मोहम्मदअली याच्या रिक्षाची धडक बसली.
या अपघातात गंभीर झालेल्या मोहम्मदअली याचे उपचाराचा फायदा न होता निधन झाले.
हिरेबागेवाडीचे उपनिरीक्षक अविनाश यारगोप्पा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.