बेळगाव लाईव्ह : शेतात मेंढ्या चरायला सोडलेल्या ठिकाणी मेंढ्या चोरण्यासाठी आलेल्या टोळीकडून मेंढपाळावर हल्ला झाल्याची घटना मजगाव परिसरात घडली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, मजगावच्या भागात एका शेतात मेंढ्या चारत असलेल्या तिघा मेंढपाळांकडे सात जणांची टोळी आली. त्यांनी पार्टीसाठी मेंढ्या मागितल्या.
मात्र मेंढ्या देण्यास नकार दिल्यानंतर या सातही जणांनी तिघा मेंढपाळांवर अचानक हल्ला चढवला आणि घटनास्थळावरून पसार झाले.
या हल्ल्यात आनंद कल्लोळर, यल्लप्पा कल्लोळर आणि गंगाराम बेळगावकर हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींवर बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद उद्यमबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.