बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 27 जानेवारी 2025 रोजी उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चन्नम्मा नगर सेकंड स्टेजयेथे दरोड्याची घटना घडली होती. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 09/2025 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 309(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, उप-पोलीस आयुक्त (गुन्हे व सुरक्षा) रोहन जगदीश, उप-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) निरंजन राजे अरस, तसेच सहायक पोलीस आयुक्त (खडेबाजार विभाग) शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या तपास पथकाने दि. 4 मार्च 2025 रोजी स्वागत रघुनाथ ढापळे (रा. शास्त्री नगर, दुसरी गल्ली, शाहापूर, बेळगाव) याला अटक केली.
त्याच्याकडून 52 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत रु. 3,50,000/-) आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी (अंदाजे किंमत रु. 50,000/-), असा एकूण रु. 4,00,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपास पथकात उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील, खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड व किरण हुनकट्टी, तसेच पोलीस कर्मचारी आर. एस. पूजारी, एस. आर. मोठनायक, टी. बी. कुंचनूर, अमरनाथ शेट्टी, एच. वाय. विभूती, ए. पी. खोते, यासीन नदाफ, एम. के. ठकई, बी. ए. करगर, तसेच तांत्रिक विभागातील रमेश अक्की आणि महादेव काशीद यांचा समावेश होता. पोलीस आयुक्तांनी या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा केली आहे.