Sunday, March 9, 2025

/

अरिहंत’मध्ये एकाच दिवशी दोन टावी शस्त्रक्रिया यशस्वी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :अरिहंत हॉस्पिटल दिवसेंदिवस आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावत आहे. एकाच दिवशी दोन टावी प्रक्रिया करून एक उदाहरण प्रस्थापित केले आहे. अरिहंत हॉस्पिटल आतापर्यंत अनेक जटिल व अवघड शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे कोणतीही शस्त्रक्रिया असो रुग्ण व नातवाईकांच्या डोळ्यासमोर एकच नाव समोर येत ते म्हणजे अरिहंत हॉस्पिटल. सातत्याने जागतिक हृदय उपचार करून अरिहंत हॉस्पिटल उत्तर कर्नाटक, गोवा व पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना सेवा प्रदान करत आहे.

हॉस्पिटलचा हा अश्वमेध यापुढेही असाच सुरू राहणार असून रुग्णसेवा प्रदान करण्यास कटिबद्ध राहणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी दोन टावी प्रक्रिया केलेल्या रुग्णांना 48 तासांत डिस्चार्ज देण्यात आला. वाढते वय व वैद्यकीय समस्यांमुळे ओपन हर्ट सर्जरीसाठी जोखीम असलेल्या रुग्णांवर कमीतकमी इन्शिषन करून टावी प्रक्रिया करण्यात आली.

टावी म्हणजे ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन प्रक्रिया होय. ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून अरिहंत हॉस्पिटलने प्रगत कार्डियाक केअरमध्ये नवीन बेंचमार्क निर्माण केला आहे. वरिष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. प्रभु हलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कुशल कॅथ लॅब पथकाने दोन्ही प्रक्रिया अचूक आणि कौशल्याने पार पाडल्या आहेत. रुग्णांनीही यासाठी योग्य तो प्रतिसाद दिला. यानंतर रुग्णांना अवघ्या 48 तासांत डिस्चार्ज देण्यात आला.

या यशाबद्दल डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, एका दिवसात दोन यशस्वी टावी प्रक्रिया पूर्ण करणे आपल्या हॉस्पिटलसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे रुग्णांप्रति नवकल्पना आणि त्यांच्या हृदयाच्या काळजीबद्दलची वचनबद्धता दर्शवते. हा टप्पा आमच्या वैद्यकीय पथकाचे कौशल्य आणि अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले प्रगत तंत्रज्ञान दाखवतो, असे त्यांनी सांगितले.Arihant

या यशाबद्दल संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी डॉक्टर व पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले.

टावी ही एक पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीसाठी एक गेम चेंजर पर्याय म्हणून उदयास आला आहे. जलद पुनर्प्राप्ती, कमीतकमी इन्शिषन व रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते. या दोन प्रक्रियांसह अरिहंत हॉस्पिटलने आतापर्यंत एकूण 10 टावी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे रुग्ण व नातवाईकांच्या मनात अरिहंत हॉस्पिटलची प्रतिष्ठा आणखी मजबूत केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.