बेळगाव लाईव्ह :स्टार एअर कंपनीने बेळगावहून तीन प्रमुख मार्गांसाठीचे तिकीट बुकिंग येत्या एप्रिल 2025 पासून थांबवले आहे. प्रभावित मार्गांमध्ये बेळगाव -तिरुपती, बेळगाव -नागपूर आणि बेळगाव – बेंगलोर यांचा समावेश आहे.
प्रवाशांची वाढती मागणी असताना या मार्गांचे बुकिंग थांबवण्याच्या निर्णयामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः उडान योजनेच्या समाप्तीनंतर आपली उड्डाणे बंद करण्याचा स्टार एअरचा इतिहास आहे. यापूर्वी या एअरलाइनने बेळगाव -जोधपूर, बेळगाव -इंदूर, बेळगाव -सुरत आणि बेळगाव -नाशिक अशा अनेक मार्गांवरील उड्डाणे मागे घेतली होती.
आता नव्या मार्ग रद्दीकरणांमुळे स्टार एअरची बेळगावमधील सेवा आणखी कमी झाली असून बेळगाव -मुंबई (दैनिक),बेळगाव -अहमदाबाद (सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार), बेळगाव -जयपूर (रविवार, सोमवार आणि गुरुवार) हे फक्त तीन कार्यरत मार्ग शिल्लक आहेत.
स्टार एअरने त्यांच्या एम्ब्रेअर ई175 च्या बेळगाव व्यावसायिक सेवा सुरू केल्या असल्या तरी
एअरलाइनच्या उपरोक्त निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. कारण त्यांना आता मर्यादित प्रवास पर्याय आणि त्यांच्या योजनांमध्ये संभाव्य अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या 5 वर्षांत उडान -मंजूर मार्गांच्या पलीकडे विस्तार करण्यात अपयशी ठरल्याबद्दल आणि बेळगावपासून कनेक्टिव्हिटी मर्यादित केल्याबद्दल अनेकांनी स्टार एअरवर टीका केली आहे. स्टार एअरच्या अधिकृत वेबसाइटनुसार बंद केलेल्या मार्गांचे बुकिंग आधीच निलंबित करण्यात आले आहे. तथापि एअरलाइनने अद्याप रद्दीकरणांचे स्पष्टीकरण दिलेले नसून ज्याची प्रवासी आणि प्रवास उत्सुक मंडळी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सदर ताज्या निर्णयामुळे स्टार एअरच्या बेळगाव हे केंद्र म्हणून दीर्घकालीन वचनबद्धतेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. स्टार एअरलाइन आपल्या निर्णयावर पुनर्विचार करेल की पर्यायी मार्ग सुरू करेल हे अनिश्चित आहे.
तोपर्यंत प्रवासी लवकरच चांगल्या कनेक्टिव्हिटी उपायांची आशा करू शकतात. 15 एप्रिल नंतरचे सध्याचे मार्ग : इंडिगो -बेळगाव बेंगलोर -2,
बेळगाव हैदराबाद, बेळगाव दिल्ली. स्टार एअर : बेळगाव अहमदाबाद, बेळगाव मुंबई, बेळगाव जयपूर.