Sunday, March 16, 2025

/

दहावी परीक्षा पूर्वतयारीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यंदाची 2024 25 सालातील एसएसएलसी अर्थात दहावीची परीक्षा सुरळीत पद्धतीने चांगल्या प्रकारे शांततेत पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात परीक्षा-1, परीक्षा-2 आणि परीक्षा-3 च्या केंद्रप्रमुखांची (मुख्य अधीक्षक) जिल्हास्तरीय बैठक जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

सदर शनिवारी झालेल्या दहावी परीक्षा पूर्वतयारीच्या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे, चिक्कोडीचे जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज, डायटचे प्राचार्य बसवराज नलतवाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दहावीच्या परीक्षेत गोंधळ होऊ नये याची जबाबदारी प्रत्येक केंद्रप्रमुखांनी घ्यावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारची आसन व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात दहावी परीक्षेचे ‘वेब कास्टिंग’ केले जाणार आहे अशी माहिती दिली.

वेब कास्टिंगसाठी तालुकास्तरावर तंत्रज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा कॉपीमुक्त होणार असून परीक्षा चांगल्या प्रकारे शांततेत पार पडावी यासाठी विविध खात्यांचे सहकार्य घेतले जावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच दहावीची परीक्षा कोणत्याही व्यत्ययाशिवाय योग्यरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.Sslc exam meeting

जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 34863 विद्यार्थी एकूण 97 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती दिली. जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेसाठी 257 मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून 600 पेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या 35 परीक्षा केंद्रांवर ज्यादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती दिली.

परीक्षा काळात 4 जिल्हास्तरीय 43 तालुकास्तरीय पथकांसह एकूण 234 भरारी पथके बेळगाव जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.