बेळगाव लाईव्ह :गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुभाषनगर येथील होलसेल फुल मार्केट येथे आज खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. फुलांचे दर तेजीत असले तरी खरेदीमध्ये उत्साह दिसत होता.
गुढीपाडव्या दिवशी गुढीला फुलांचा हार चढवण्याबरोबरच घरोघरी आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट केली जाते. त्यामुळे फुलांना मोठी मागणी असते हे लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे सुभाषनगर येथील महापालिकेच्या होलसेल फुलांच्या मार्केटमध्ये शेवंती, झेंडू, गलाटा, अष्टर, गुलाब वगैरे विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची मोठी आवक झाली आहे.
नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे फुलांचे दर वाढले असले तरी उद्या गुढीपाडवा असल्यामुळे आज शनिवारी सकाळी फुलांच्या खरेदीसाठी फुल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. सणानिमित्ताने शेवंती मोगरा वगैरे फुलांच्या माळा, गुलाब व अन्य फुलांचे बुके अर्थात पुष्पगुच्छ देखील विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे पहावयास मिळत होते.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने बेळगावच्या फुल मार्केटमध्ये विविध प्रकारच्या फुलांची आज पुढील दराने विक्री झाली. पांढरी शेवंती -300 रुपये प्रति किलो, बारीक गुलाब -300 रु. किलो, केशरी झेंडू -60 ते 100 रु. किलो,
पिवळा झेंडू -30 ते 70 रु. किलो, पिवळी शेवंती -300 रु. किलो, लोकल गलाटा -100 ते 160 रु. किलो, अष्टर -250 रु. किलो, पिवळी शेवंती -250ते 300 रु. किलो, गुलाब गुच्छ -100 ते 150 रु. एक, जरबेरीया फुल -7 ते 10 रुपयाला एक फुल.