बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या नागरिकांमध्ये शांतता, तंदुरुस्ती आणि एकता वाढविण्यासाठी बेळगाव शहर पोलीस प्रशासनातर्फे उद्या रविवार दि. 9 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजता ‘रन फॉर पीस’ या मॅरेथॉन दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सामुदायिक उपक्रमाला शहरातील सीपीएड कॉलेज मैदानावरून प्रारंभ होणार असून ही मॅरेथॉन दौड 5 कि.मी. आणि 10 कि.मी. अशा दोन गटात घेतली जाईल.
तरी शांती आणि कल्याणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमामध्ये शहरातील नागरिक, सर्व सरकारी कार्यालयं, महाविद्यालयं, शाळा,
वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षक व्यवस्थापन संस्था, क्रीडाप्रेमी आणि डॉक्टरांनी थोडक्यात समस्त शहरवासीयांनी सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केले आहे.