बेळगाव लाईव्ह :गणाचारी गल्ली बकरी मंडई बेळगाव येथे समुदाय भवनासाठी राखीव असलेल्या जमिनीवरून दोन गटात सुरू झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
यावेळी दोन गटात किरकोळ दगडफेक झाली असून या घटनेत एकजण किरकोळ जखमी देखील झाला असून त्याच्यावर बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन गटात झालेल्या भांडणात वीसहून अधिक लोक सहभागी होते. या घटनेनंतर या परिसरात तणाव निर्माण झाला होता घटनास्थळी आणि इस्पितळात पोलिस दाखल झाले आहेत.
गेल्या काही दिवसापासून समुदाय भावनांच्या जागेवरून हा वाद धुमसत आहे. दोन्ही गटातील लोकांनी मोर्चा काढत या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे आपापली बाजू प्रशासनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार समुदाय भवनांच्या जागेवरून हा प्रकार घडला आहे. किरकोळ दगडफेक झाली एक जण किरकोळ जखमी झाला आहे दोन्ही गटाकडून त्या जागेच्या सर्वेसाठी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून त्या जागेवर दावा करण्यात येत आहे.