घरगुती वादातून पुतण्याने केला काकाचा खून पाटील मळा येथील घटनेने खळबळ

0
10
Anil dhamnekar
 belgaum

बेळगाव लाईव्ह : संपत्तीच्या घरगुती वादातून पुतण्याने स्वतःच्या काकाचा जांबीयाने भोसकून खून केल्याची घटना शहरातील पाटील मळ्यात बुधवारी रात्री 10: 15 वाजताच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ वाजली आहे.

अनिल शरद धामणेकर वय 46 रा. पाटील मळा बेळगाव असे या चाकू हल्ल्यात ठार झालेल्या मयताचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान आदित्य दीपक धामणेकर पुतण्या आणि अनिल धामणेकर (काका) यांच्यात बाचाबाची झाली त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन आदित्यने अनिल यांच्या पोटात जांबीयाने सपासप वार केले. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत अनिल यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अति रक्तस्त्राव आणि पोटावर झालेल्या वारामुळे रात्री साडेबाराच्या दरम्यान अनिल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पुतण्या आदित्य दीपक धामणेकर आणि  काका अनिल शरद धामणेकर यांच्यात संपत्तीवरून काही काळापासून वाद सुरू होता बुधवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळला आदित्य यांने आपल्या काका अनिल वर जांबियाने वार करून त्यांचा खून केला.

 belgaum

संपत्तीच्या वादातून आदित्यने आपल्या काकावर जांबीयाने हल्ला केला असल्याची माहिती समोर आली असली तरी आणखी दुसरे कोणते कारण आहे का याचा तपास देखील पोलीस करत आहेत. रात्री साडेदहा वाजता घटनास्थळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आणि खडे बाजार पोलिसांनी देखील धाव घेतली होती.Anil dhamnekar

गेल्या काही दिवसात बेळगाव शहर परिसरात चाकूने हल्ला करण्याच्या घटनात वाढ झाली आहे . नवी गल्ली शहापूर येथे झालेल्या खून प्रकरणानंतर पंधरा दिवसातील बेळगाव शहरातील हे दुसरे खून प्रकरण आहे.या घटनेने पाटील मळा परिसरात एकच खळबळ माजली होती.

अनिल धामणेकर हे पाटील मळा भागातील एक सामाजिक कार्यात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व होते. काल रात्री ही घटना समजताच अनिल यांच्याशी संबंधित जिल्हा रुग्णालया बाहेर मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले याचा परिवार आहे. क्षणिक रागातून एका होतकरू तरुणाचा बळी  गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.