Friday, December 5, 2025

/

रोजच्या चुकीच्या लाइफस्टाईल मुळे वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढताना दिसून येतोय. याचे नक्की कारण काय हे शोधायचे झाले ते जगण्याची चुकीची पध्दत हेच मुख्य कारण असल्याचे मत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ सविता कद्दु यांनी व्यक्त केले.

महिला दिनानिमित्त संजीवींनी फौंडेशनच्या वतीने आठ मार्च ते आठ एप्रिल हा महिना महिला आरोग्य जागृती मास म्हणून पाळण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज शिवम नगर येथील शिवमंदिरात स्तनाचा कर्करोग या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉ सविता देगीनाळ,शिवम महिला संघाच्या अध्यक्षा सुरेखा नगरे,उपाध्यक्षा भाग्यश्री ताशीलदार उपस्थित होत्या.
स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूक असणे ही सध्या काळाची गरज आहे कारण अलीकडच्या काळात स्तनाचा कर्करोग अत्यंत सामान्य झाला असला तरी या स्थितीबद्दल जागरूकतेचा अभाव दिसून येतो आहे त्यासाठी स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी, स्तनामध्ये गाठ किंवा बदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क साधावा.Kaddu

 belgaum

नियमित स्तनांची तपासणी आणि वेळीच उपचार केल्यास कर्करोगावर मात करता येते असेही त्या म्हणाल्या.यावेळी उपस्थित महिलांच्या अनेक शंकांचे निरसन डॉ कद्दु यांनी केले.

तत्पूर्वी उपस्थितांचे स्वागत पद्मा औशेकर यांनी तर प्रास्ताविक डॉ सविता देगीनाळ यांनी केले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
मिथाली कुकडोळकर यांनी स्वागतगीत म्हंटले.
यावेळी डॉ देगीनाळ यांच्याहस्ते डॉ कद्दु यांचा शाल स्मृतिचिन्ह गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

शेवटी भाग्यश्री ताशीलदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज आम्हा महिलांना खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली याचा उपयोग उपस्थित प्रत्येक स्त्रीला होईल असे सांगून संजीवीनी फौंडेशन व डॉ सविता कद्दु यांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता बायाण्णाचे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास शिवमनगर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा औशेकर यांनी तर आभार कावेरी लमाणी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.