बेळगाव लाईव्ह: तानाजी गल्ली भांदूर गल्ली कॉर्नर येथील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल रद्द झाल्यानंतर रेल्वे खात्याने या ठिकाणी असलेला रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.आगामी 10 मार्चपासून हा रेल्वे फाटक बंद होणार असल्याचा फलक दक्षिण पश्चिम रेल्वेच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आला आहे.
लेवल क्रॉसिंग 386 म्हणजेच तानाजी गल्ली फुलबाग गल्ली कॉर्नरचा रेल्वे फाटक आता रहदारीसाठी बंद होणार आहे. त्यामुळे तानाजी गल्ली फुलबाग गल्ली मधून लोकांना ये जा करणाऱ्यांसाठी जुन्या पीबी रोड किंवा कपिलेश्वर उड्डाणपुलाचा वापर करावा लागणार आहे.
या ठिकाणी केंद्रीय रेल्वे खात्याने उड्डाणपूल मंजूर केला होता मात्र स्थानिक नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे सदर प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्यात आला होता आणि त्यावेळीच सदर फाटक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार दक्षिण पश्चिम रेल्वेने या ठिकाणी फलक लावत आगामी दहा मार्च पासून रहदारीसाठी हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर रेल्वे फाटक बंद झाल्याने नेमके कोणते परिणाम होऊ शकतात?
महाद्वार रोड परिसरातून उत्तर भागात शाळेची वर्दी रिक्षाचे फी वाढू शकते,फोर्ट ते तानाजी परिसरातील दुकानातील व्यापारात फरक जाणवणार,गेट बंद झाल्याने जागांचे भाव देखील घसरू शकतात.
भांदुर गल्ली, ताशीलदार गल्ली, फुलबाग गल्लीतील घरगुती गणेश विसर्जन ब्रीजचा वापर करून करावे लागणार,ओल्ड पी बी रोड माणिकबाग सर्व्हिस रस्ता पूर्ण नसल्याने रहदारीला अडथळे निर्माण होणार,
कपिलेश्वर मंदिर सर्व्हिस रोड आणि शनि मंदिर रस्ता अरुंद असल्याने रहदारीला निर्माण होऊ शकतात अडथळे,तानाजी गल्ली महाद्वार रोड समर्थ नगर परिसरातील मार्केटला जाणाऱ्या महिलांना ब्रिजचा वापर करून उत्तर भागात जावे लागणार आहे.मुंबई सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते या फाटक बंद बेळगाव शहराचे दोन तुकडे उत्तर दक्षिण होणार,रूपाली सिनेमा पासून येडीयुरप्पा रोड पर्यंत वाढू शकते फोर्ट रोडचे ऑटो मोबाईल मार्केट