बेळगाव लाईव्ह :दुकानासमोर ऑटो रिक्षा पार्क केल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान दोघाजणांनी दोघा भावांवर प्राणघातक शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यामध्ये झाल्याची खळबळजनक घटना शहरातील खडेबाजार येथील शितल हॉटेल नजीक आज गुरुवारी घडली.
गंभीर जखमी झालेल्या भावंडांची नावे उमर मनियार आणि उझर मनियार अशी आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची नावे सिराज देसाई आणि अफजल देसाई आहेत.
खडे बाजार येथे उमर व उझर यांचे दुकान आहे. या मनियार बंधूंनी ऑटो रिक्षा मागून ती आपल्या दुकानासमोर उभे केली यावरून सिराज आणि उमर यांच्या वादावादीला सुरुवात झाली आणि त्याचे पर्याय मनियार बंधुंवर प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यामध्ये झाले.
या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.