कानडीकरणाचा कहर : घंटागाडीवर फक्त कन्नडच गाणी

0
25
City corporation logo
City corporation logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिका आयुक्त शोभा बी. यांनी आता कानडीकरणाचा कहर करण्यास सुरुवात केली असून बेळगाव शहरात घरोघरी कचरा जमा करणाऱ्या घंटागाडीवरील गाणी देखील आता केवळ कन्नड भाषेतच लावण्यात यावावीत, असा आदेश त्यांनी दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाडीवर लावली जाणारी जुनी मराठी, हिंदी गाणी बंद करून त्याऐवजी नवी कन्नड गाणी लावण्यास सुरुवात केली आहे.

शहरानजीक कर्नाटक परिवहन मंडळाच्या वाहकाला मारहाण झाल्याच्या कथेत घटनेनंतर सीमा भागातील भाषिक वाद पुन्हा उफाळून आला होता. त्यावेळी कन्नड प्रेम दाखवण्यासाठी मनपा आयुक्त शोभा बी. यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते.

त्यात शहरातील मराठी व इंग्रजी भाषेतील फलक हटविणे, पालिकेच्या कामकाजात 100 टक्के कन्नड भाषेचा वापर करणे आणि घंटागाडीवरील मराठ व हिंदी भाषेतील गाणी बंद करण्याच्या निर्णयांचा समावेश होता.

 belgaum

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार न घेतल्यामुळे फलक हटविण्याची मोहीम बारगळली, तथापि घंटागाडी वरील गाणी बदलण्याच्या आदेशाची आरोग्य विभागाने तातडीने अंमलबजावणी केली आहे.

बेळगाव महापालिकेत मराठी नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असली तरी तेथील मराठीचा प्रभाव करण्याचा प्रयत्न काही वर्षांपासून नियोजनबद्धरित्या सुरू असून आता कचऱ्याची उचल करणाऱ्या घंटागाडी वरील मराठी व हिंदी गाणी बंद करून फक्त कन्नड गाणी लावण्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेतील मराठी नगरसेवकांनी अद्याप याला आक्षेप घेतल्या नसल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.