बेळगाव लाईव्ह :बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी लोकसभेमध्ये संरक्षण वापरासाठी भाड्याने घेतलेल्या राज्य सरकारच्या जमिनींसह बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील संरक्षण खात्याच्या जमिनीच्या एकूण व्याप्तीबद्दल विचारणा केली.
खासदार शेट्टर यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी पुढील प्रमाणे तपशील दिला. बेळगाव जिल्ह्यातील एकूण संरक्षण जमीन : 3430.3832 एकर. बेळगाव शहर व छावणीच्या (कॅन्टोन्मेंट) अंतर्गत : 1604.6912
एकर. कॅन्टोन्मेंटबाहेर : 1470.905 एकर. बळगाव शहराबाहेर : 354.787 एकर. कँटोन्मेंट बोर्ड बेळगाव संरक्षण ताब्यात असलेल्या राज्य सरकारच्या जमिनीबद्दल माहिती देताना मंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्यातील राज्य सरकारची कोणतीही जमीन सध्या संरक्षण वापरासाठी भाड्याने दिलेली नाही.
तथापि त्यांनी 10 वर्षांसाठी (2002-2012) भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या रामदुर्ग फील्ड फायरिंग रेंजचा (एफएफआर) उल्लेख केला. कर्नाटक सरकारने संरक्षण वापरासाठी 50 हेक्टर वनजमीन मंजूर केली होती.
ज्याची भाडेपट्टी 28 ऑगस्ट 2023 रोजी बेळगाव विभागाच्या उपवनसंरक्षकांना आधीच 7,50,000 रुपये देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.