बेळगाव लाईव्ह :सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील शक्तीस्थळ श्री रेणुका देवी अर्थात श्री यल्लमा देवस्थानाला माजी मंत्री सी. टी. रवी यांनी नुकतीच भेट देऊन देवदर्शन घेतले.
माजी मंत्री सी. टी. रवी यांनी आपल्या समर्थकांसमवेत नुकतीच सौंदत्ती डोंगराला भेट दिली. यावेळी त्यांनी पायी चालत जाऊन श्री यल्लमा देवीचे दर्शन घेतले. यावेळी गाभाऱ्यात मंदिर व्यवस्थापनाकडून देवीच्या प्रतिमेची भेट देऊन माजी मंत्री सी. टी. रवी यांचा सत्कार करण्यात आला.
देवदर्शन नंतर मंदिर व्यवस्थापनाची माहिती घेऊन माजी मंत्री रवी यांनी मंदिरातील प्रसादाचाही लाभ घेतला. याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील,
आमदार महेश टेंगिनकाई, माजी आमदार संजय पाटील, भाजप मंडल अध्यक्ष विरुपाक्ष मामनी, राज्य माध्यम समिती सदस्य एफ. एस. निध्दनगौडर, भाजप नेते इराण्णा चंदरगी,
मुरुगेंद्रगौडा पाटील, गुरुपाद कळ्ळी, नयना बी., सचिन कडी, संतोष देशनूर, दादागौडा बिरादार आदी प्रमुखांसह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.