कॅम्पमधून भाग्यनगर येथील युवकाचे अपहरण अन् सुटका

0
5
Camp police
 belgaum

बेळगाव लाईव्ह :भाग्यनगर सहावा क्रॉस येथील एका युवकाचे कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल जवळील रस्त्यावरून कारमधून अपहरण करण्यात आल्याची घटना गेल्या 28 फेब्रुवारी रोजी घडली असून काल बुधवारी कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची फिर्याद नोंदविण्यात आल्यानंतर पोलीस तपास सुरू झाला आहे.

भाग्यनगर सहावा क्रॉस येथील अन्वर मुस्तफा दफेदार या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा नालकर, प्रफुल्ल चौगुले व अन्य तिघा -चौघाजणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, अन्वर दफेदार याने गेल्या 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल जवळील रस्त्यावर आपली कार गाडी (क्र. पीवाय 05 एन 4248) उभी केली होती.

 belgaum

त्यावेळी कृष्णा, प्रफुल्ल व इतर तिघा -चौघाजणांनी तेथे येऊन महेश सुतगट्टी कुठे आहे? अशी विचारणा अन्वर याच्याकडे केली. त्यावेळी अन्वरने आपल्याला माहीत नसल्याचे सांगताच त्याच्याच कारमध्ये त्याला कोंबून गोजगा गावाजवळील एका शेतवाडीत नेण्यात आले.

त्या ठिकाणी अन्वरला मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल व कारची कागदपत्रे काढून घेण्याबरोबरच टीओ फॉर्मवर त्याच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याची सुटका करण्यात आली.

अपहरणानंतर मला व माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे फिर्याद देण्यास उशीर झाल्याचे अन्वर दफेदार याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.